आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा.. तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट !

15 june 2024

Created By :  Manasi Mande

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नुकताच (14 जून) वाढदिवस झाला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातही त्यांची मोठी क्रेझ आहे.

राज यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे. वाढदिवसानिमित्त देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही खास पोस्टद्वारे राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! हसत रहा साहेब, असं तिने नमूद केलं.

हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !

तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा ! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा, असंही तेजस्विनीने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तची ही पोस्ट बरीच चर्चेत आहे.