विक्की कौशलचं मराठी प्रेक्षकांना खास गिफ्ट; प्रसिद्ध मराठी मालिकेत एंट्री, दमदार मराठी डायलॉग

8 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

अभिनेता विक्की कौशलचा 'छावा' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी विक्की अनेक ठिकाणी फिरतोय. विक्कीकडून मराठी प्रेक्षकांसाठी खास गिफ्टही आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील एका प्रसिद्ध मराठी मालिकेत विक्की कौशलची एंट्री होणार आहे

मालिकेतील कलाकारांबरोबरचे विक्की कौशलचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत.

विक्कीने 'घरोघरी मातीच्या चुली' या मराठी मालिकेच्या सेटवर खास हजेरी लावली.

मालिकेत दाखवण्यात आलेल्या श्री आणि सौ स्पर्धेत जानकी-ऋषिकेश स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की त्यांना खास टिप्स देणार आहे

"खेळ असो नाहीतर लढाई, हिंमत हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्यानेही जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते."

"आपल्या टीमला सोबत घेऊन लढायचं असते आणि जगात नवरा बायकोपेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या"

विक्कीने हा कानमंत्र देत यांनी जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत 'छावा' सिनेमा पहाण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

दरम्यान या मालिकेच्या निमित्ताने विकीचे मराठीतले संवाद पुन्हा ऐकायला मिळणार का?