लाइफ मे कई मेंढकों को चूमना पडता है...प्रियांका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ

4 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये दहा वर्ष लहान निक जोनससोबत लग्न केलं

प्रियांकाने हा निर्णय का घेतला याचा खुलासा 6 वर्षांनी तिने केला आहे

एका मुलाखतीत प्रियांकाने सांगितले की तिला असाच कोणीही जोडीदार म्हणून नको होता.

प्रियांका म्हणाली की,आधी बऱ्याचवेळा ती नात्यांमध्ये फसवली गेली आहे.त्यामुळे तिच्यासाठी प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे.

"माझ्या जोडीदाराने माझ्या कुटुंबाला समजून घेणं आणि त्याने त्याच्या कामाला गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे."

तसंच पुढे ती म्हणाली की, तिच्यासोबत मोठी स्वप्न पाहाणारा जोडीदार तिला हवा होता

प्रियांकाने निकचे कौतुक करत तिला हवा होता तसाच जोडीदार असल्याचं तिने म्हटलं आहे

"पण जोपर्यंत तुम्हाला तुमचा परफेक्ट जोडीदार मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला अनेक मुर्खांना किस करावं लागतं"

असं म्हणत तिने तिच्या लग्नापूर्वीच्या अफेअर्सबदद्ल वक्तव्य केलं आहे.