'अपने मर्दो को...', 38 वर्षांनंतर नवरा गोविंदासोबत कसं आहे नातं? सुनीता स्पष्टच बोलली

1 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलीवूड सुपरस्टार गोविंदाने 1987 मध्ये सुनीतासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 38 वर्षे झाली आहेत

मात्र, गोविंदाची पत्नी सुनीताने तिच्या काही मुलाखतींमध्ये ती आपल्या मुलांसोबत पतीशिवाय दुसऱ्या घरात राहते असं सांगितलं होतं 

त्यानंतर अनेक यूजर्सनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच घरातील वादांवरही चर्चा होत होत्या.

सुनीताने गोविंदासोबतच्या नात्यावर पुन्हा एकदा मौन सोडले आहे. तिला गोविंदापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असं ती म्हणाली.

एका मुलाखतीत सुनीताने सांगितले की, गोविंदासोबतचे तिचे नाते फारच अतूट आहे. कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही.

'असे अनेक लोक आहेत ज्यांना घर तोडायचं आहे. पण मी आमचं घर तुटू देणार नाही. मी जिंकेन कारण बाबा माझ्या सोबत आहेत.'

'तुम्ही तुमच्या नवऱ्याची नेहमी काळजी घ्या' सुनीताने महिलांना नातेसंबंध सांभाळण्याचा सल्लाही दिला.