21 March 2024

शिवाजी महाराज यांच्या काळात अशी खेळली जात होती होळी

Mahesh Pawar

असे म्हटले जाते की शिवाजी महाराज यांच्या काळात होळीचे लोकोत्सव असे स्वरूप होते.

रायगडावरील मंदिर ते बाजारपेठ यादरम्यान एक मोठे पटांगण करण्यात आले होते. त्याचे होळीचा माळ असे नाव ठेवले होते.

रायगडावरील शिरकाई माता हिच्या साक्षीने होळीच्या माळावर होळी उत्सव, नवरात्र आणि देवीची यात्रा सुरु करण्यात आली होती.

चैत्र पौर्णिमेचा म्हणजेच होळीचा उत्सवही शिवाजी महाराज यांनी सुरु केला होता.

या घटनेचा पूर्ण तपशील उपलब्ध नसला तरी राज्याभिषेक सोहळ्यावरून याची कल्पना येते.

रायगडावरील सण, उत्सव यासाठी होणाऱ्या जमा खर्चाच्या नोंदी उपलब्ध आहेत.

यात हुताशनी पौर्णिमेसाठी पुजेची दक्षिणा अर्ध्या रुपये दिल्याची यांची नोंद आढळून आली आहे.

शिवाजी महाराज यांनी 1671 साली रायगडावर होळी उत्सव साजरा केला याची नोंद आहे.

शिवाजी महाराज यांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या अखेरच्या काळापर्यंत सुरु होता.

होळी उत्सव दरम्यान होळीच्या माळावर खिळे यायचे, सोंगे काढली जायची, हलगीच्या सुरात दांडपट्टा, बाणती, तलवार, कुस्तीचे फड रंगायचे.

शिवाजी महाराज यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहत असल्याने सगळे हवसे, नवसे आपली कला दाखवीत असत.