24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेल्या मिठाईची किंमत ?

08 November 2023

Created By : Manasi Mande

दिवाळीचा सण आता उंबरठ्यावर पोहोचला आहे. या सणादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते.

दिवाळीनिमित्त विविध मिठाई बाजारात दाखल झाल्या आहेत. 

पण यावेळचे आकर्षण आहे ती सोन्याचा मुलामा असलेली मिठाई..

आता 24 कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेली मिठाई येवल्याच्या बाजारात दाखल झाली आहे.

विशेष म्हणजे या सोनेरी मिठाईची किंमत ऐकाल तर .

सोन्याचा मुलामा लावलेल्या या एका किलो मिठाईसाठी 6 हजार रुपये मोजावे लागतील.

ही मिठाई तयार करण्यासाठी केसर, ड्रायफ्रुट्सचा वापर करण्यात आला असून यावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामाही देण्यात आला आहे.

सोन्याची किंमत वाढल्याने मिठाई देखील महागली आहे. पण तरीही या गोल्डन मिठाईला ग्राहकांकडून मोठी मागणी मिळत आहे.

तेलच नव्हे ‘हे’ पदार्थही गरम केल्यास ठरतात विषासमान !