17 March 2024

HOLI |  होळी दहनात या खास गोष्टी अर्पण करा, वैवाहिक संबंध मजबूत होतील.

Mahesh Pawar

ज्योतिष शास्त्रानुसार होळी दहनात काही वस्तू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम कायम राहते.

आजारापासून आराम मिळवण्यासाठी होळी दहनात कापूर आणि हिरवी वेलची घालावी.

वैवाहिक जीवनात काही अडथळे, काही अडचण येत असेल तर होळी दहनावेळी प्रदक्षिणा घालून हवन साहित्य अर्पण करावे.

असे मानले जाते की अशा प्रकारे विवाह होण्याची शक्यता निर्माण होते. वैवाहिक जीवन आनंदाने भरले जाते. 

लक्ष्मी देवीला प्रसन्न करायचे असेल तर कोरडे खोबरे घेऊन त्यात साखर आणि तांदूळ भरावे.

होळी दहनात अर्पण करा. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

होळी दहनात कच्चा कापूस अर्पण केला तर कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत करते. शनीचा दोषापासून आराम मिळतो.

कुटुंबातील कोणताही सदस्य दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या नावावर कच्चा कापूस घेऊन ते होळी दहनात टाकावे.