21 May 2024

13 स्टार्सनी नाकारलेला चित्रपट अमिताभने केला, रेखानेही केला असा डबलरोल...

Mahesh Pawar

गोविंदा, मिथुन, जॅकीदा, अनिल कपूर, सलमान, शाहरुख, आमिर यांच्यासह एकूण 13 सुपरस्टार्सनी ती भूमिका नाकारली होती.

त्या सुपरस्टार्सनी नकार दिलेली भूमिका करण्यास अखेर बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली.

हा चित्रपट होता सूर्यवंशम ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी डबल रोल केला होता.

'सूर्यवंशम' चित्रपट 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला आणि आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

सूर्यवंशमच्या निर्मात्यांना या चित्रपटात पिता पुत्र जोडी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कास्ट करायचे होते.

या चित्रपटात अमिताभ यांनी ठाकूर भानुप्रताप आणि त्यांचा मुलगा हिरा ठाकूर अशा दुहेरी भूमिकेत दिसले.

भानू प्रताप यांची पत्नी जयसुधा आणि हिरा ठाकूरची पत्नी सौंदर्या यांच्याही या चित्रपटात   भूमिका होत्या.

दोघीही दाक्षिणात्य नायिका आहेत, त्यातील 17 वर्षांनी लहान अशा जयसुधा यांच्या मुलाची भूमिका त्यांनी केली होती.

अमिताभ बच्चन यांच्या या दोन्ही ऑनस्क्रीन पत्नीचे डबिंग बिग बी यांच्या तथाकथित गर्लफ्रेंड राहिलेल्या अभिनेत्री रेखा यांनी केले होते.