किडनी (मूत्रपिंड) रक्त स्वच्छ करणे आणि शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर काढण्याचे काम करते.

17 July 2025

किडनीची नियमित देखरेख करणे गरजेचे आहे. परंतु अनेक जण किडनीकडे दुर्लक्ष करतात.

जास्त पेन किलर्स औषध घेणे, जास्त मीठ किंवा जंक फूड खाणे, पुरेसे पाणी न पिणे, कमी झोपणे किंवा जास्त प्रथिने खाणे यासारख्या सवयी किडनीला नुकसान पोहोचवू शकतात.

किडनीसाठी समस्या निर्माण करणाऱ्या सहा सवयीसंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जास्त प्रमाणात पेनकिलर घेणे किडनीसाठी धोकादायक असते. या औषधी किडनीचा ब्लड फ्लो कमी करतात.

जास्त मीठ घेतल्यामुळे ब्लड शुगर वाढते. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूडमधून जास्त मीठ येते. हे किडनीसाठी नुकसान करणारे असते. 

जास्त प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड ) खाल्ल्याने तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते. या पदार्थांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो.

पुरेशी झोप न झाल्यास किडनी चांगले काम करु शकत नाही. यामुळे रोज सात ते आठ तास झोपे आवश्यक आहे. चांगली झोप किडनीला निरोगी ठेवते. 

आरोग्यासाठी प्रोटीन चांगले आहे. परंतु जास्त प्रोटीन घेतल्यास किडनीवर तणाव वाढतो. ते त्याला फिल्टर करुन काढावे लागते. 

जास्त साखर सेवन केल्यामुळे वजन वाढवते. त्यामुळे मधुमेहसारखे आजार वाढते. त्यामुळे किडनीला धोका निर्माण होतो.