अंजीर खाल्ल्याने महिलांना होतील 'हे' महत्त्वाचे फायदे

21 July 2025

Created By: Shweta Walanj

अंजीरात लोह  मुबलक प्रमाणात असते, जे महिलांमध्ये होणाऱ्या अ‍ॅनिमियासाठी (रक्ताची कमतरता) फायदेशीर ठरते.

 अंजीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात, विशेषतः मेनोपॉज नंतर.

अंजीर हे नैसर्गिक एस्ट्रोजेनचे स्रोत आहे, जे मासिक पाळी नियमित ठेवण्यास व पीसीओडी/पीसीओएससारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

अंजीरात फायबर भरपूर प्रमाणात असते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

 अंजीरात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवतात.

अंजीर हे लो-कॅलरी फळ असून त्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.