खारीक खाल्ल्यामुळे लहान मुलांना होणारे फायदे

06 December 2025

Created By:  Shweta Walanj

खारीकमध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात ज्यामुळे मुलांना त्वरित ऊर्जा मिळते.

खारीकमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता कमी करून पचनक्रिया सुधारते.

हाडांच्या वाढीस मदत होते. कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे आणि दात मजबूत बनवतात.

खारीकमध्ये लोह चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांमध्ये अॅनिमिया कमी होण्यास मदत होते.

खारीकमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

खारीकमध्ये असलेले नैसर्गिक खनिज मेंदूची वाढ, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारायला मदत करतात.