गुळ आणि चणे आरोग्यास अत्यंत लाभदायक
22 July 2025
Created By: Shweta Walanj
गूळ आणि चणा मिळून घेतल्यास शरीराला तात्काळ व दीर्घकाळ ऊर्जा मिळते. हे स्नायूंना बळकट करतात.
गूळात लोह भरपूर असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा कमी होतो.
चण्यातील फायबर्स व गूळातील नैसर्गिक घटक पचनासाठी फायदेशीर असतात. गॅस, अपचन यावरही मदत होते.
चण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम व मॅग्नेशियम असते, जे हाडे आणि स्नायू मजबूत करतात.
गूळ आणि चणा नियमित खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, विशेषतः हिवाळ्यात.
गूळामुळे रक्तशुद्धी होते व चण्यात असलेले पोषकतत्त्व त्वचा आणि केसांना आरोग्यपूर्ण ठेवतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...