शरीरातील ब्लड शुगर वाढल्यावर मुधमेह (डायबिटीज)चा धोका निर्माण होतो.
11 July 2025
रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी काही ज्यूस फायदेशीर आहे. जाणून घेऊ त्यासंदर्भातील माहिती.
मेथीचे पाणी घेणे फायदेशीर आहे. १ टेबलस्पून मेथीचे दाणे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
मेथीच्या पाण्यात विरघळणारे फायबर असतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सचे जलद शोषण होते. तसेच इन्सुलिन देखील सुधारते.
अर्धा ग्लास पाण्यात २ चमचे आवळ्याचा रस मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखरेची पातळी संतुलित करतात.
दालचिनीची काडी एका कप पाण्यात १० मिनिटे उकळवा. गरम प्या. दालचिनी उपवासाच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
कारल्याचा काढून त्यात थोडे पाणी मिसळा. ते गाळून रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
कोरफड आणि तुळस एकत्र करून त्याचा रस बनवा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. चयापचय वाढतो.