17 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
ब्रेन फॉग हा आजार नाही तर मानसिक थकव्याचे लक्षण आहे. यामुळे विचार करण्यात अडथळा येतो, मन धाकधूक राहते आणि लक्ष केंद्रीत होत नाही. तुम्ही गोष्टी विसरायला लागता.
डॉ. रोहित कपूर यांच्या मते, दररोज पुरेशी झोप न घेतल्याने मेंदूवर परिणाम होते. त्यामुळे त्याचं कार्य मंदावते. विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची शक्ती कमी प्रभावित होते
फोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर तासनतास घालवल्याने मेंदूवर परिणाम होतो. लक्ष विचलित होते. डोळे थकतात. मानसिक थकवा जाणवते. ब्रेन फॉकमध्ये त्याचं रुपांतरीत होते.
जास्त साखर, जंक फूड आणि कॅन केलेले अन्न मेंदूवर परिणाम करतात. शरीराला अत्यावश्यक घटक मिळत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या पेशी योग्यरित्या काम करू शकत नाहीत.
दिवसभर पाणी कमी प्यायल्यास मेंदूच्या पेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत. याचा विचार करण्यावर आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होते.
सततच्या तणावामुळे मेंदू थकतो. मेंदूवर भावनिक दबाव येतो. विचार करण्याची क्षमता गमवू लागतो. विचार करणं कठीण होतं.
दिवसभर बसून असाल आणि व्यायाम केला नाही तर मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा कमी होतो. मेंदूची गती मंदावते.