'हा' त्रास असणाऱ्या व्यक्तींनी खजूर खाऊ नये

08 June 2025

Created By: Shweta Walanj

खजूरामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खजूर मर्यादित प्रमाणातच खावे.

खजूरामध्ये कॅलोरीचे प्रमाण जास्त असते. वजन कमी करत असलेल्या लोकांनी खजूर खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे.

काही लोकांना खजूरामुळे त्वचेवर पुरळ, सूज किंवा इतर अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात. अशांनी खजूर खाणे टाळावे.

खजूर गरम प्रवृत्तीचे असल्यामुळे काही लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅसेस किंवा छातीत जळजळ होऊ शकते.

लहान मुलांना खजूर पचवणे कठीण जाऊ शकते. त्यांना गिळताना अडचणही येऊ शकते, त्यामुळे ते देताना काळजी घ्यावी.

खजूरामध्ये फायबर जास्त असल्यामुळे अतिसार किंवा कमजोर पचन असलेल्या लोकांनी खजूर टाळावे.