23 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
रक्तामध्ये युरिक एसिडचे प्रमाण सामान्याहून जास्त झाले तर पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना होतात. सांध्यात सूज, लालसरपणा व स्पर्श केल्यास उष्णता भासते.
हाय युरिक एसिडच्या पेशंटना संधिवाताचा धोका असतो.कारण युरिक एसिड क्रिस्टलच्या रुपात सांध्यात जमतो. डॉ.शुभम वात्स्य यांनी कोणती फळे खाऊ नये हे सांगितले आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की हाय युरिक एसिड असेल तर सर्वात आधी रेड मीट आणि ऑर्गन मीट खाऊ नका. यात प्युरिन खूप जास्त असते आणि थेट युरिक एसिड लेवल्सला वाढवतात.
डॉ.शुभम वात्स्य यांनी सांगितले की सी फूड देखील प्युरिनने जास्त असते. खास करुन सार्डिन आणि शेल फिश
शुगरी ड्रिंक्सना टाळणे उत्तम असते. सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज ज्युसमध्ये असलेल्या हाय फ्रुक्टोजमुळे युरिक एसिड जास्त निर्माण होते.
तज्ज्ञाच्या मते अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स खाऊ नये. यात रिफाईंड काब्स आणि जास्त प्रमाणात शुगर असते. ज्यामुळे थेट इन्सुलिन रेजिस्टन्सला बिघडवतात. त्यामुळे युरिक एसिड आणखी निर्माण होते.
मद्य खास करुन बिअर युरिक एसिडची निर्मिती जास्त करते. त्यामुळे युरिक एसिडचा त्रास असल्याने मद्य घेऊ नये.