आंब्यासोबत हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा महागात पडेल...
काही लोक आंबे खाण्यासाठी एप्रिल-मेची वाट पाहात असतात. कारण याच मोसमात हे फळ येते. अनेक लोक मँगो शेक म्हणूनही याची चव चाखतात.
हेल्थलाईनच्या मते एक कप म्हणजे सुमारे १६५ ग्रॅम आंब्यात ९९ कॅलरी, प्रोटीन( १.४ ग्रॅम),कार्ब्स (२४.८ ग्रॅम), फॅट (०.६ ग्रॅम),फायबर (२.६ ग्रॅम),शुगर (२२.६ ग्रॅम) आणि डेली व्हॅल्यूच्या हिशेबाने ६७ टक्के व्हिटामिन सी मिळते.
उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यानंतर त्याच्या सोबत अन्य काही पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते. आंबे खाल्यानंतर आंबट पदार्थ अजिबात खाऊ नयेत. त्यामुळे पोटात केमिकल रिएक्शन देखील होऊ शकते.
लोक आंबा आणि दूध यांचा शेक बनवतात. मात्र, आयुर्वेदानुसार यामुळे पित्त वाढते. आंबा लवकर पचतो तर दूध उशीरा. त्यामुळे पचन यंत्रणेवर ताण येतो.
आंबा आणि दही मिक्स करु नये. यामुळे डायजेस्टीव्ह सिस्टीम बिघडू शकते. प्रोबायोटिक फूड दह्यात लॅक्टीक एसिड असते. तर आंब्यात नैसर्गिक साखर असते. यांना एकत्र खाल्ल्याने पोटात फर्मेंटेशन वाढू शते. आणि गॅस-ब्लोटिंगची तक्रार होऊ शकते.
रात्री जेवणानंतर आंबा खाल्ला जातो. मात्र, तळलेले पदार्थ खाल्यानंतर आंबा खाल्ला तर बॉडी हीट सेंसेशनला वाढ होते.त्यामुळे एसिड रिफ्लक्स वाढू शकतो.
राजमा, छोले वा नॉन व्हेज फूड्स खाल्ल्यानंतर आंबा खाणे भारी पडू शकते. हेव्ही प्रोटीन पचायला वेळ लागतो. हाय प्रोटीन आणि नैसर्गिक साखर यांचा कॉम्बो गॅस्ट्रीक लोड वाढवू शकतो.