Created By: Atul Kamble

01 May 2026

 डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा

 आजकालच्या तणावजन्य परिस्थितीमुळे आपण डिप्रेशनपासून वाचण्यासाठी अनेक उपाय आजमावतो. परंतू काही वाईट सवयी देखील डिप्रेशन वाढवतात.

 जर तुम्हाला डिप्रेशनपासून मुक्तता हवी तर काही सवयींना रुटीन पासून हटवणे गरजेचे असते.

 कमी झोप घेतल्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डिप्रेशन वाढते.दर रोज ८ तास झोपण्याचा प्रयत्न करा

जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडने देखील मेंदूवर परिणाम होतो.त्यामुळे डिप्रेशन वाढू शकते.

 निगेटिव्ह विचार केल्याने देखील त्याचा मेंदूवर परिणाम होतो.डिप्रेशन त्यामुळे वाढू शकते.

 फिजिकल एक्टीव्हीटी कमी केल्याने देखील डिप्रेशन येऊ शकते.व्यायामाने एंडोर्फिन रिलीज होते.जे तणावाला दूर करते.

सोशल मीडिया सतत पाहिल्याने डिप्रेशन येऊ शकते. लोक स्वत:ची तुलना दुसऱ्यांचा परफेक्ट जीवनशैलीशी करतात आणि त्यामुळे नैराश्य वाढू शकते.

( डिस्क्लेमर -  ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )