Created By: Atul Kamble
01 May 2026
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
अंजीर फायबर,व्हिटामिन्स आणि मिनरल्सचे पॉवर हाऊस आहे.ते ताजे किंवा सुखे दोन्ही प्रकारे खाता येते.
अंजीरात विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असते.त्यामुळे बद्धकोष्ठतेत ते फायद्याचे असून पोट स्वच्छ ठेवते.
अंजीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने अंजीर ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते.हृदयासाठी ते गरजेचे असते.
अंजिरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम जास्त असल्याने ते हाडांना मजबूत करते.
अंजिरात फायबर जास्त असल्याने पोट बराच काळ भरलेले वाटते. त्यामुळे ओव्हर इटींग टाळले जाऊन वजन कमी होते.
अंजीरातील एंटीऑक्सीडेंट आणि व्हिटामिन्स त्वचेला चमकदार तसेच केसांना योग्य पोषण देतात.
अंजीर पुरुषांना अधिक फायद्याचे असते. कारण यामुळे स्पर्म काऊंट आणि फर्टीलिटी वाढण्यास मदत होते.
शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी काय खावे ?