Created By: Atul Kamble

30 April 2026

 शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी काय खावे ?

आजच्या खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहाराने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

आज आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत त्यांच्या सेवनाने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. 

 गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी ओट्स,ब्राऊन राईस, क्विनोआचा डाएटमध्ये समावेश करु शकता.

 जे लोक सालमन, सार्डिन आणि मॅकरेल सारखे मासे खातात त्यांच्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.कारण माशात ओमेगा -३ फॅटी एसिड असते.

नट्सचे सेवन शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवते.बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्सचे सेवन यासाठी करावे.

संत्री, सफरचंद, बेरीज, पालक, ब्रॉकली आणि गाजर सारखे हेल्दी फूड्सने गुड कोलेस्ट्रॉल वाढते.याचे रोज सेवन केल्याने काहीच दिवसात फरक जाणवतो.

ग्रीन टीमुळे वजन वेगाने कमी होते. तसेच शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढू शकते. एकदा सेवन करुन पाहावे.

 गुड कोलेस्ट्रॉलचे हे पदार्थ जरी असले तरी त्यांचे मर्यादितच सेवन करावे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर दुष्पपरिणाम होतात.