Created By: Atul Kamble

30 April 2026

उन्हाळ्यात हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी काय करायचे ?

उन्हाळ्यात तीव्र उष्णता आणि डीहायड्रेशनमुळे हाय बीपीची समस्या वाढू शकते. शरीरात पाण्याची कमतरता, जास्त घाम आणि चुकीचा आहार यामुळे ब्लडप्रेशर असंतुलित होऊ शकते. ज्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. यापासून कसे वाचायचे ते पाहूयात..

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट राखणे महत्वाचे असते. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. नारळपाणी आणि लिंबू पाणी देखील घ्यावे.यामुळे शरीराचे संतुलन कायम राहाते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी मीठ कमी प्रमाणात खावे.जास्त मीठाने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे बीपी वाढू शकतो. प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडपासून दूर राहाणे फायद्याचे असते.

उन्हाळ्यात तेलकट आणि तिखट आहार घेऊ नये. फळे, भाज्या आणि फायबरने भरपूर डाएट घ्यावे. केळी,कलिंग आणि काकडी सारखे पदार्थ शरीराला थंड ठेवतात आणि बीपी कंट्रोल ठेवण्यास मदत करतात.

हायबीपी कंट्रोल करण्यासाठी रोज हलका व्यायाम वा योग करणे गरजेचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी फिरणे चांगले असते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. आणि तणाव कमी होतो.

जास्त तणाव घेतल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते.मेडिटेशन, खोल श्वास घेण्याचा व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि बीपी नियंत्रणात राहातो.

तीव्र ऊन्हात जास्त राहिल्याने शरीरावर परिणाम होतो. बाहेर जाताना टोपी, छत्री, स्कार्फ आणि पाणी सोबत ठेवावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित रहाते. आणि हायबीपी वाढण्याचा धोका कमी होतो.