शरीरातील या लक्षणांना साधारण समजू नका,देतात या आजारांचे संकेत
आपले शरीर कोणताही आजार सुरु होण्याआधी काही विशिष्ट प्रकारचे संकेत देत असते. त्यांना वेळीच ओळखता आले तर समस्या वाढण्यापासून रोखता येते.
व्हिटामिन बी-१२ च्या गंभीर कमतरतेने किंवा ऑटोइम्युन समस्येमुळे त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.
रात्री झोपताना पायात जळजळ किंवा सुन्नपणा हा एक खतरनाक संकेत असतो. डायबिटीजच्या समस्येत रुग्णांना असे संकेत मिळतात.
तोंडातून सातत्याने दुर्गंधी येणे हे गट हेल्थच्या गडबडीचे संकेत आहेत.अपचन, एसिड रिफ्लक्स वा लिव्हरशी संबंधित समस्येत असे होऊ शकते.
हात-पाय थंड पडण्याची समस्या खराब ब्लड सर्क्युलेशन वा थायरॉईड ग्लँडची समस्येचे संकेत असू शकतात.रक्ताचा संचार नीट न झाल्याने हाता-पायांना रक्त न पोहचल्याने ते गार पडतात.
जर तुम्हाला जास्त खारट वस्तू खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर हे मिनरल लॉस वा एड्रनल फटीगचे लक्षण असू शकते.
पापणी फडफडण्याचे लक्षण मॅग्नेशियमची कमतरता किंवा झोप पूर्ण न झाल्याने नर्व्हस सिस्टीममध्ये होत असलेल्या स्ट्रेसला दर्शवते.
अचानक पिंपल्स येत असतील तर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, इंसुलिनचा स्तर वाढणे, वा खूप जास्त तणावाचा हा परिणाम असू शकतो.
अनियमित शौचास येणे - गट हेल्थ बिघडणे वा खराब लिव्हर फंक्शनकडे हे अंगुलीनिर्देश करते. पचन यंत्रणेला स्वस्थ राखणे गरजेचे असते.
कान वाजणे - कानात शिट्टीसारखा आवाज येणे हे नेहमी तणाव, नर्व्हमध्ये सुज वा व्हिटामिन बी-१२ च्या कमतरतेशी संबंधित असू शकते.