कारलं खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे.. 

23 June 2024

Created By :  Manasi Mande

कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... अशी एक म्हण आहे.

कारल्याची चव अत्यंत कडू असते. त्यामुळे बऱ्याच जणांची ती नावडती भाजी आहे.

पण हेच कडू कारलं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचं सेवन फायदेशीर आहे.

कारलं खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

कारल्यामध्ये फायबर उच्च प्रमाणात असतं. ते खाल्ल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

यकृतासाठीही कारल्याचे सेवन चांगलं ठरतं.

 कारलं खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होतं.

आहारात कारल्याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

कारल्याचं सेवन करणं हे आपल्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर ठरतं.