बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं काय? जाणून घ्या

5 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिजीज, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या समस्या होऊ शकतात.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात काही लक्षण दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊयात.

डॉ. अजित जैन यांच्या मते, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने छातीत दुखतं किंवा जडपणा जाणवू शकतो. नसांमध्ये चरबी जमा झाल्यावर असं होतं.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयावर दाब वाढतो. त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो. चालताना धाप लागते किंवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने डोळ्याभोवती आणि त्वचेवर पिवळे डाग येऊ शकतात.  त्याकडे दुर्लक्ष करू नका.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्ताभिसरण मंदावते. हात पाय सुन्न होऊ शकतात आणि दुखतात.

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा