शरीराला भरपूर प्रमाणात मिळणार प्रोटीन, अशा पद्धतीने खा मनुके
21 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
मनुक्यात व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. प्रोटीनचं हे उत्तम स्रोत आहे. फक्त खाण्याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक आहे.
रात्री पाच ते दहा मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी पाणी आणि मनुके खा.
आठ ते दहा मनुके दुधात उकळून खा. यामुळे अशक्तपणा रोखण्यास मदत होते. तसेच लोहाचे प्रमाण झपाट्याने वाढते.
मनुके सूप किंवा चटणीमध्ये मिसळून खाऊ शकता.
बदाम, काजू इत्यादी इतर सुक्या मेव्यासोबतही मनुके मिसळून खाऊ शकता.
मनुक्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. स्नायू बळकट करण्यास मदत होते. लाल रक्तपेशी निर्मितीस मदत होते.
मनुके मर्यादीत प्रमाणात खा. कारण यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. यामुळे इतर आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अग्निपंचकात हवन केल्याने काय होते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा