27 November 2025
Created By: Atul Kamble
केळी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने एनर्जी तर बूस्ट होईलच शिवाय पोटॅशियम असल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहिल.
सफरचंदात फायबर भरपूर असल्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. यात एंटीऑक्सीडेंट्स असल्याने एकूणच आरोग्यासाठी फळ चांगले असते.
सकाळी कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट होते. यात लायकोपीन एंटी - ऑक्सिडेंट आढळते. ते हृदय आणि स्कीनला चांगले बनवते.
पपई खाल्ल्याने शरीराला पपैन तत्व मिळते. त्याने पचन चांगले होण्यास मदत मिळते. पोट साफ राखण्यास देखील मदत मिळते
पेरूमध्ये व्हिटामिन्स ए, बी आणि सी असते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्या )