इलेक्ट्रोलाइट पावडर पिण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या

18 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करण्यासाठी या पावडरचे सेवन केले जाते. यात सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड आणि ग्लुकोज असते.

डॉ. सुभाष जैन यांच्या मते, जास्त घाम येणे, उलट्या होणे, जुलाब होणे यामुळे शरीरातील पाणी कमी होते. यात इलेक्ट्रोलाइट पावडर त्वरित हायड्रेशन करते. 

ग्लुकोज थकवा कमी करते आणि त्वरीत ऊर्जा देते. उष्णता आणि व्यायामादरम्यान शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत करते.

सोडियम आणि पोटॅशियमसारखे घटक स्नायू आणि नसांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहेत. त्याचे संतुलन ठेवते.

गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने सोडियम वाढू शकते. यामुळे रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. तसेच शरीराला सूज येते. 

इलेक्ट्रोल पावडरमध्ये साखर असते. यामुळे मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नये. 

शरीर डिहायड्रेट झाले नसेल तर इलेक्ट्रॉल पावडर प्यायल्याने उपयोग होत नाही. त्याचा मूत्रपिंडावर भार पडू शकतो. 

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?