वाढलेले वजन हा ही एक प्रकारचा आजारच आहे. कारण त्यामुळे इतर अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते.
19 July 2025
वय आणि उंचीनुसार आपले वजन नियंत्रण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी आहार महत्वाचा आहे.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार संतुलित करावा लागेल. त्यात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करावा लागेल.
तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर तुम्ही मेथीचे दाणे फायदेशीर ठरणार आहे.
मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर, लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, नियासिन आणि रिबोफ्लेविन असतात. यामुळे मुळे वजन जलद गतीने कमी होते.
मेथी दाण्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील चयापचय वाढवतात आणि चरबी जाळण्यास मदत करतात.
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित होते. जास्त खाण्याची इच्छा कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. पण ते रिकाम्या पोटी खाणे चांगले. यासाठी रात्री एक चमचा मेथीचे दाणे भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या.