Created By: Atul Kamble
02 May 2026
कापलेले कलिंगड किती वेळापर्यंत खाण्यायोग्य असते ?
कलिंगड उन्हाळ्यातील सर्वात पसंद केले जाणारे फळ आहे. मात्र, या कापल्यानंतर किती काळापर्यंत खाणे योग्य असते ?
जर तुम्ही कापलेल्या कलिंगडाला रुम टेंपरेचरला ठेवले असाल तर दोन तासांच्या आत खाणे योग्य ठरते.
मात्र, जर तुम्ही कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवले असेल तर ते ३ ते ५ दिवस खाता येऊ शकते.
मात्र, जर तुम्ही कलिंगड कापून फ्रिजमध्ये स्टोअर करत आहात तर एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवूनच स्टोअर करा.
जर तुम्ही कलिंगड खात असताना आंबट किंवा विचित्र चव आणि आंबल्या सारखा वास येत असेल, चिकटपणा जाणवत असेल तर ते खराब झाल्याचे समजावे.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )
या 5 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक