17 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
केसांमध्ये खाज येणे ही सामान्य बाब आहे. पण आजार नाही. पण वारंवार येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौम्या सचदेवा यांच्या मते, टाळूवर साचलेला कोंडा खाज येण्याचं प्रमुख कारण आहे. टाळूवर कोरडेपणा वाढतो आणि बुरशीजन्य संसर्ग होतो आणि खाज सुटते. शाम्पू किंवा इतर उपचारांनी नियंत्रित करता येते.
केस बराच काळ स्वच्छ न केल्यास टाळूवर घाण जमा होते आणि तेल साचते. त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे खाज सुटते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवावे.
काही शाम्पू, कंडिशनर किंवा केसांच्या सीरममध्ये असलेली रसायने टाळूला इजा पोहोचवतात. एलर्जीमुळे खाज येऊ शकते.
सोरायसिस, एक्झिमा किंवा सेबोरेहिक डर्माटायटीस सारख्या त्वचेच्या आजारामुळेही खाज येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोक्यात उवा किंवा निका असतील खाज सुटते. उवा केसांच्या मुळात अंडी घालतात. त्यामुळे अस्वस्थ वाटते आणि खाज सुटते.
केसांची वेळच्यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी टाळू स्वच्छ आणि मॉइश्चरायझ्ड करणं गरजेचं आहे. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही उत्पादनं वापरा.