सध्या हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरचे रुग्ण वाढले आहेत. 

21 July 2025

अंजीर हे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे आरोग्यही चांगले राहते.

अंजीरमध्ये पोटेशियम मुबलक प्रमाणात आहे. उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) असणाऱ्या रुग्णांना आहारात पोटेशियम वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

पोटेशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करतो. त्यामुळे रक्त वाहिन्या शिथिल होतात. पर्यायाने ब्लड प्रेशर कमी होतो. 

तज्ज्ञांच्या मते हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी अंजीरचे सेवन केले तर त्यांचा रक्तदाब सामान्य होतो. 

अंजीर फक्त रक्तदाबच सामान्य करत नाही तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवतो. 

नियमित अंजीरचे सेवन केल्यावर ह्रदयाचे आरोग्यही चांगले राहणार आहे. 

पचनासाठी अंजीरचे सेवन लाभदायक आहे. त्यामुळे बद्धकोष्ठताची समस्याही सुटण्यास मदत होते.