वेगाने वाढतील केस,कोंडाही दूर होईल, या तेलांचा वापर करा
Created By: Atul Kamble
10 FEB 2026
नारळ तेल - नारळ खोलवर पोषण करण्यासाठी सर्वात विश्वासार्ह मानले जाते. यातील फॅटी एसिड स्कॅल्पच्या आतपर्यंत जाऊन केसांच्या मुळांना मजबूत करते.
एरंडेल तेल - एरंडेल तेल केसांची वाढ करते. यातील रायसिनोलिक एसिड ब्लड सर्क्युलेशनला चांगले करते, ज्यामुळे नवे केस उगवतात.
आवळा तेलात व्हिटामिन-सी असल्याने ते केसांना मजबूत करण्यासोबत वेळेआधी पांढरे केस होण्याचे प्रमाण कमी होते. केसाची कोंडा कमी करुन स्कॅल्पला थंडावा देते.
भृंगराज तेलाला आयुर्वेदात 'केशराज' म्हटले जाते. हे तेल केसांच्या मुळांचे पोषण करते. केस गळती रोखते.ज्याचे केस गळतीवर उत्तम काम करते.
बदाम तेलात व्हिटामिन्स - E, मॅग्नेशियम आणि ओमेगा फॅटी एसिड आढळते.हे केसांना सॉफ्ट आणि मजबूत बनवते.ड्राय आणि फ्रीजी केसांना बदाम तेल चांगला पर्याय आहे.
कांद्याच्या तेलात सल्फर भरपूर असते. जे केसांच्या वाढीत महत्वाची भूमिका बजावते.हे तेल स्कॅल्पमध्ये कोलेजन प्रोडक्शन वाढवते.ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.केस दाट होतात.
ऑलिव्ह ऑईल, म्हणजे जैतूनचे तेल स्कॅल्पला डीप मॉश्चराईज करण्यास मदत करते. रुक्ष आणि डॅमेज केसांची भरपाई करते. दोन मुळे असलेल्या केसांची समस्या कमी करते. केस सिल्की आणि चमकदार होतात.