भारतात अन्नात अनेक मसाले वापरले जात आहेत. काही मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. 

13 June 2025

दालचिनी हा प्राचीन काळापासून आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांमध्ये वापरला जाणारा महत्वाचा मसाला आहे. 

सुंगधित असणाऱ्या दालचिनीमध्ये फायबर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी मानले जाते. दालचिनीचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

दालचिनीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहते. 

दालचीनी इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढवून ब्लड शुगरचे नियंत्रण करते. त्याचा फायदा डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना होतो. 

नियमित १ ते ६ ग्रॅम दालचिनी घेतली तर ती कोलेस्टेरॉल वेगाने कमी होऊ शकते. 

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत १ चिमूटभर दालचिनी पावडर घेतल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.