अन्नातून विषबाधा झाली हे  कसं कळतं? ते कसं टाळता येईल?

12 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

अन्नातून अनेकदा विषबाधा होते. दूषित किंवा बॅक्टेरिया संक्रमित अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. 

अन्न व्यवस्थितरित्या न शिजवणे, अस्वच्छता, शिजवलेलं अन्न जास्त काळ ठेवल्याने संक्रमण होतं. अनेकदा विषबाधा ही स्ट्रीट फूड, शिळं अन्न खाल्ल्याने होते.

अन्नातून विषबाधा होते तेव्हा शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. 

डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, अन्न विषबाधा झाली की सुरुवातीला उलट्या होतात. शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वारंवार उलट्या होतात. 

पचनसंस्थेवर त्याचा थेट परिणाम होतो आणि त्यामुळे वारंवार शौचास येते. यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.

अन्न विषबाधेमुळे पोटात दुखते. कधी कधी ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते. बाधित अन्न खाल्ल्यानंतर काही तासांनी हा त्रास सुरु होतो. 

नेहमी ताजे आणि चांगले शिजवलेले अन्न खा. भाज्या शिजवण्यापूर्वी धुवून घ्या. बाहेरचे अन्न खाण्यापूर्वी त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. 

कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणं काय असतात? ते जाणून घ्या