नाचणीची भाकरी आरोग्यास किती आणि कशी फायदेशीर
04 February 2026
Created By: Shweta Walanj
नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
नाचणीमध्ये फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन व्यवस्थित राहते.
नाचणीची भाकरी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अति खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते.
नाचणी रक्तवाढीस मदत करते, त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
नाचणीतील फायबर व अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी ठेवायला मदत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.
नाचणी ऊर्जा देणारी व सहज पचणारी असल्याने लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्धांसाठी विशेष उपयुक्त आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...