Created By: Atul Kamble
09 May 2026
गुडघेदुखीपासून सुटका कशी मिळवाल ? हे उपाय येतील कामी
कमी वयात देखील चुकीचा आहार, जास्त वेळ बैठे काम, वजन जास्त वाढणे यामुळे गुडघेदुखीचा त्रास वाढला आहे.
जास्त वजनाचा थेट गुडघ्यावर भार येतो. त्यामुळे सूज आणि वेदना होते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रित करावे.
चालणे, स्ट्रेचिंग आणि योगासने केल्याने स्नायू मजबूत होतात.त्यामुळे गुडघ्यांना आधार मिळतो आणि वेदना कमी होते.
हाडांना मजबूत करण्यासाठी दूध, दही, पनीर, अंडी आणि कोवळ्या उन्हात फिरणे गरजेचे असते.त्यामुळे व्हिटामिन डी आणि कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
एकाच जागा एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसू नये, त्यामुळे तर ३० -४० मिनिटांनी थोडे चालावे आणि पाटांना स्ट्रेच करावे.
आरामदायक आणि कुशनवाले बुट घालावेत,त्याने गुडघ्यांवर दबाव कमी येतो. कडक सोलावाल्या बुटांनी वेदना वाढू शकते.
हळदी आणि आल्यामुळे सूज कमी होते. त्यामुळे यांचा दुध आणि चहात वापर करावा. त्यामुळे गुडघ्याची सूज कमी होते आणि आराम मिळतो.
उन्हाळ्यात शुगर का जास्त वाढते ? कशी नियंत्रणात आणावी ?