Created By: Atul Kamble

09 May 2026

उन्हाळ्यात शुगर का जास्त वाढते ? कशी नियंत्रणात आणावी ?

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, जास्त घाम, चुकीचा आहार आणि शरीरातील कमी पाण्यामुळे ब्लड शुगरची पातळी वाढू शकते.यास कसे कंट्रोल करावे हे पाहूयात...

 उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी गेल्याने शुगर लेव्हल प्रभावित होऊ शकते.दिवसभर जास्त पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट रहाते. आणि शुगर नियंत्रित राखण्यास मदत होते.

उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक, पॅकेट ज्यूस, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने शुगर वाढते.त्याऐवजी लिंबू पाणी, नारळपाणी, बिन साखरेचे पेय पदार्थ प्यावेत.

तेलकट आणि तिखट तसेच पचायला जड जाणारे पदार्थ उन्हाळ्यात खाऊ नयेत.सलाड, हिरव्या भाज्या, दही, फायबरने भरपूर पदार्थ खावेत.त्याने फायदा होतो.

सकाळी आणि संध्याकाळी हलका व्यायाम करावा.योगासने तसेच वॉक केल्याने शरीर एक्टीव्ह राहाते.शुगर कंट्रोलमध्ये मदत मिळते.

उन्हाळ्यात नियमित शुगर तपासावी, वेळोवेळी तपासणी केल्याने शुगर नियंत्रित करणे सोपे जाते.

 पुरेशी झोप घ्यावी, जास्त ताण-तणावाने देखील शुगर वाढू शकते. सात ते आठ तास झोप घेतल्याने शुगर नियंत्रित रहाते.