पपई नैसर्गिक पिकली आहे की केमिकलने! असं ओळखाल

22 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

पपईत फोलेट, पोटॅशियम,व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडेंट सारखं पोषक घटक आहेत. आरोग्यासाठी हे घटक फायदेशीर आहेत. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. यात पॅपेन नावाचे एंजाइम असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. 

पपई बाजारात सहज मिळते. पण ही पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे कशी पिकवली आहे हे ओळखणं गरजेचं आहे. 

नैसर्गिक पिकलेल्या पपईचा रंग समान पिवळा किंवा नारंगी असतो. तर केमिकलने पिकवलेल्या पपईमध्ये हिरवे किंवा पिवळे पॅच असतात. 

पपईचं साल जाड आणि दाबल्यानंतरही दाबली जात नसेल तर ती केमिकलने पिकवली आहे. कारण नैसर्गिक पिकलेली पपई थोडी नरम असते आणि दाबली जाते. 

पपई कापल्यानंतर आतामध्ये कच्ची आणि बाहेर पिकलेली असेल तर केमिकलने पिकवली आहे हे समजून जा. कारण नैसर्गिक पिकलेल्या पपईचा रंग सामान्य असतो. 

नैसर्गिक पिकलेल्या पपईची चव गोड आणि सामान्य असते. पण केमिकलने पिकवलेल्या पपईला वेगळा वास येतो. तसेच अनेकदा थोडी कडवट लागते. 

फॅटी लिव्हरमुळे केस गळण्याची लक्षणं कोणती?