फॅटी लिव्हरमुळे केस गळण्याची लक्षणं कोणती?
22 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
फॅटी लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते. त्यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होते. इतकंच काय तर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
जास्त प्रमाणात मद्यपान, खराब आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
फॅटी लिव्हरची केसांवर अनेक लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. नेमकं काय ते जाणून घ्या.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ भावुक धीर यांनी सांगितलं की, फॅटी लिव्हरमुळे शरीराला पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. केस वेगाने गळतात.
फॅटी लिव्हरमुळे शरीराच्या डिटॉक्स प्रक्रियेवर परिणाम होतो. यामुळे टाळू कोरडी पडते, तसेच खाज सुटू शकते.
फॅटी लिव्हरमुळे शरीरात प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बीची उणीव भासते. यामुळे केस पातळ होतात आणि कमकुवत होतात.
फॅटी लिव्हरमुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि केसांच्या वाढीवर परिणाम होतो. नवीन केसांची वाढ होण्याची प्रक्रिया मंदावते.
पपई नैसर्गिक पिकली आहे की केमिकलने! असं ओळखाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा