Created By: Atul Kamble
16 May 2026
उन्हाळ्यात पोटाचे आरोग्य कसे चांगले राखावे ?
उन्हाळ्यात तीव्र उष्णता आणि पाणीच्या कमतरता आणि बाहेरील जेवण यामुळे पोट सारखे बिघडत असते.अशा वेळी हलके जेवण फायद्याचे असते.
दही खाल्ल्याने पोटात थंडावा निर्माण होतो. पचन प्रक्रिया चांगली होते. गॅस, अपचन, एसिडीटीसारखी समस्या दूर होते.
केळ सहज पचते आणि पोटाला आराम देते. यात फायबर आणि पोटॅशियम असते जे बद्धकोष्ठता दूर करते.पचन यंत्रणा चांगली करते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटात थंडावा होतो. एसिडीटी, अपचन आणि जळजळ दूर होते.
कलिंगड पाण्याचे प्रमाण वाढवते. उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगले करते. मात्र, जास्त वेळ कापून ठेवलेले कलिंगड खाऊ नये.
पपईत पपेन नावाचे एंजाईम असते. त्यामुळे जेवण पचनास मदत होते. यामुळे गॅस, अपचनाची समस्या दूर होते.
नारळ पाणी शरीरात इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राखते. पोटाला थंडावा देते. एसिडीटी कमी करते, डिहायड्रेशनपासून वाचवते. पचन यंत्रणा चांगली करते.
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याचे काय फायदे ?