Created By: Atul Kamble
08 May 2026
लघवीत दिसतील हे बदल तर किडनीची चाचणी कराच...
किडनी शरीराचा महत्वाचा अवयव आहे.हा शरीरातील टॉक्सिन आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढतो...
किडनीची क्षमता घटते तेव्हा ती काही सुरुवातीचे संकेत देते.त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका.
किडनी खराब होण्याची लक्षणे लघवीत दिसतात.लघवीच्या प्रमाणात अचानक बदल झाला तर सावध व्हा
लघवीत फेस येत असेल वा त्यात रक्त दिसत असेल तर हे गंभीर संकेत आहेत. याचा अर्थ किडनी योग्य प्रकारे फिल्ट्रेशन करत नाहीए
किडनी खराब झाल्याने एरिथ्रोपॉयटिन हार्मोची कमतरता होते.ज्यामुळे लाल पेशी कमी तयार होऊ लागतात.
किडनी योग्यरितीने सोडियम आणि पाणी बाहेर काढत नसेल तर याने चेहरा, घोटा आणि पायात सूज येते
- किडनी फेल होण्याचे अन्य संकेतही असतात. भूक न लागणे,उलटी, मळमळ, श्वास घेण्यास त्रास,त्वचेला खाज सुटणे, रुक्षपणा इत्यादी.
जर ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांची लागलीच भेट घ्या, सुरुवातीच्या उपचारांनी किडनी वाचवता येते.
Ertiga कार खरेदीसाठी महिना पगार किती हवा ?