आजकाल बऱ्याच लोकांना यूरिक ॲसिड वाढून सांधेदुखीचा त्रास होत असतो.
15 June 2025
यूरिक ॲसिड वाढल्यास शरीराकडून अनेक संकेत मिळतात. यूरिक ॲसिड किडनीमध्ये साठल्यास किडनी स्टोनचा त्रास होतो.
यूरिक ॲसिड सांध्यांच्या ठिकाणी जमा होऊन सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा व वेदना निर्माण होते.
लघवीचा रंग गडद झाला असेल तर यूरिक ॲसिड वाढल्याचे ते संकेत आहे. सतत ताप येणेसुद्धा यूरिक ॲसिड वाढल्याचे संकेत देते.
शरीरात सतत खाज येत असेल तर यूरीक ॲसिड वाढल्याचे संकेत असते.
सतत थकवा आणि अशक्तपणा येत असेल तर यूरिक ॲसिडची चाचणी करुन घ्या. बऱ्याचदा यूरिक ॲसिडचा आजार अनुवंशिकतेमुळे येतो.
आहारामध्ये सी फूड, मटण, प्रोसेस्ड फूड, जंक फूड हे पदार्थ जास्त खाण्यात येत असेल तर यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढते.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?