मसल्स बनवण्यासाठी वर्कआऊट गरजेचे आहे. तसेच चांगला आहारही महत्वाचा आहे.
30 June 2025
मसल्य बनवण्यासाठी कोणते पदार्थ उपयोगी ठरणार आहेत, त्याची माहिती तुम्हाला देणार आहोत.
डेअरी प्रॉडक्ट मसल्स बनवण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. आहारात हे रात्री घेणे अधिक चांगले आहे.
मसल्स चांगले करण्यासाठी संपूर्ण अंडे खा. बरेचदा लोक अंड्याचा पिवळा भाग फेकून देतात. त्या पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि कोलीन असते.
ग्रीक योगर्टमध्ये नियमित दह्यापेक्षा जास्त प्रथिने असतात. त्यात प्रोबायोटिक्स देखील असते. जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे एक प्रकारचे नैसर्गिक प्रोटीन आहे.
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, लोह असते. हे मसल्ससाठी खूप महत्वाचे आहेत. दररोज नाश्त्यात त्याचा समावेश करु शकता.
क्विनोआ हे प्रोटीनचे भंडार आहे. त्यात आयरन आणि मॅग्नेशियम सुद्धा असते. भाताऐवजी क्विनोआचा समावेश तुम्ही आहारात करू शकता.
डाळींमध्ये मुबलक प्रोटीन आहे. तसेच फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. आहारात डाळींचा समावेश फायदेशीर ठरतो.