लिची खाणं या लोकांसाठी धोकादायक? का ते जाणून घ्या

15 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, कॉपर, पोटॅशियम, नैसर्गिक साखर, कार्ब्स आणि फायबर असते. त्यामुळे लिची खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते आणि यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. 

डॉ. पंकज वर्मा म्हणाला की, काही वैद्यकीय परिस्थितीत लिची खाणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे काही लोकांनी खाणं टाळावं. 

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर जास्त प्रमाणात लिची खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकतं. 

लिचीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी कमी प्रमाणात खावे. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. 

काही लोकांना लिचीची एलर्जी असू शकते. लिची खाल्ल्याने खाज सुटणे, ओठांना सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

जास्त प्रमाणात लिची खाल्ली तर रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून तीन चार लिची खाणं योग्य ठरेल. 

तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगात कोणाचं रक्त?