मलेरिया झाल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसतात? जाणून घ्या

22 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

मलेरिया हा एनाफिलीस नावाचा डास चावल्याने होतो. हा डास चावल्यानंतर प्लास्मोडियम पॅरासाईट आपल्या शरीरात प्रवेश करते. यामुळे मलेरिया होतो.

मलेरिया झाल्यानंतर अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. 

डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, मलेरियामुळे ताप येऊ शकतो. तसेच थंडी वाजते आणि घामही येतो. ताप उतरत नाही.

गंभीर प्रकरणात मलेरिया झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातून रक्त येऊ शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

मलेरिया झालेल्या व्यक्तीला उलट्या होतात. तसेच अशक्तपणा जाणवतो. उलट्या होणं हे गंभीर लक्षण आहे.

मलेरिया झालेल्या व्यक्तीला हगवण लागू शकते किंवा डायरिया सारखी समस्या होऊ शकते. 

मलेरिया झालेल्या व्यक्तीला तापासोबत अंगदुखी, थकवा येऊ शकतो. या काळात अशक्तपणा जाणवू शकतो.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?