दही आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु ते कशासोबत खावे, हे पाहणेही महत्वाचे आहे.
14 July 2025
उन्हाळ्यात फक्त दहीच नाही तर दह्यापासून बनलेले ताक, लस्सी खाणेही फायदेशीर आहे.
दही या पाच फूडसोबत खाणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यासंदर्भात जाणून घेऊ या.
मासे उष्ण असतात अन् दही थंड असतो. दोन्ही एकत्र खाल्ल्यास ते तुमच्या शरीराला मिश्रित संकेत देतात. त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते किंवा जडपणा येऊ शकतो.
फळे चिरून दह्यासोबत खाणे अनेकांना हेल्दी स्नॅकसारखे वाटते. पण ते पोटाला पचायला खूप कठीण असते.
फळ लवकर पचतात, पण दही पचण्यास वेळ लागतो. दोघे एकत्र सेवन केल्यावर पोटात फर्मेंट होऊ शकतो. ज्यामुळे गॅस किंवा पोटफुगीची समस्या उद्भवू शकते.
दूध आणि दही हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. पण दूध गोड आणि हलके असते, तर दही आंबट आणि घट्ट असते. हे दोन्ही मिसळल्याने तुमचे पचन बिघडू शकते.
दही आणि उडीद डाळ एकत्र खाणे घातक आहे. उडीद डाळ घट्ट असते. जर ती दह्यासोबत खाल्ली तर ती आणखी जड वाटू शकते आणि पचनक्रिया मंदावू शकते.
कांदा तिखट असतो, तर दही थंड आणि आंबट असते. हे दोन्ही एकत्र घेतल्यास शरीरात असंतुलन निर्माण करू शकतात.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर