या 7 देशात नागरिकत्व मिळवणे सर्वात अवघड काम

Created By: Atul Kamble

19 january 2026

 लोक अनेक जगात अनेक देशात नोकरी आणि व्यापारासाठी जातात.अनेक देशात नागरिकत्व मिळवणे सोपे असते. तर काही देश असे आहेत जेथे नागरिकत्व मिळवणे महाकठीण आहे.

 कतारची नागरिकता मिळविण्यासाठी तेथे किमान २५ वर्षे वास्तव करावे लागते.इस्लाम धर्म स्वीकारणेही गरजेचे असते आणि जुनी नागरिकत्व सोडावे लागते.

 भूतानचे नागरिकत्व मिळण्यासाठी तेथे किमान २० वर्षे रहाणे, जुनी नागरिकत्व सोडावे लागणे आणि जोंगखा भाषेची परिक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

सौदी अरबमध्ये नागरिकत्वासाठी १० वर्षे रहावे लागते.अरबी भाषा येणे गरजेचे असते.तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असावा लागतो

 कुवैतची नागरिकत्व मिळवण्यासाठी तेथे २० वर्षे रहावे लागते.मुस्लीम असणे गरजेचे असते. आणि अरबी भाषा येणे गरजेचे असते.

स्वित्झर्लंड येथील नागरिकतेसाठी येथे १० वर्षे राहणे, राष्ट्रीय भाषा येणे आणि कोणताही क्राईम रेकॉर्ड नसणे गरजेचे असते.

चीन दोन देशाची नागरिकता स्वीकारत नाही. जुनी नागरिकता सोडावी लागते. चीन नागरिकाशी लग्न करावे लागते.

जपानी नागरिकत्वासाठी येथे ५ वर्षांसाठी राहाणे अनिवार्य आहे.जपानी भाषा यायला हवी.याशिवाय आधीचे नागरिकत्व सोडायला हवे.