घरातच तयार करा 5 प्रकारचे हेअर टॉनिक, केस होतील सुंदर

Created By: Atul Kamble

 23 january 2026

हिवाळ्यात केस गळतीमुळे महिलांना नकोसे वाटते, ड्रायनेस,हेअर फॉल आणि कोंडाही होतो.अशावेळी नैसर्गिक तेल कामी येते.

घरात तयार केलेल्या हेअर टॉनिकने कोणताही साईड इफेक्ट होत नाही.चला पाहूयात ५ हेअर टॉनिक तयार करण्याची कृती 

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा,नंतर बदाम तेलात त्यांना मिक्स करा. मेथीत प्रोटीन आणि आयर्न असते. त्यामुळे केस मजबूत बनून केसगळती कमी होते.

आधी आवळा पावडर तयार करा,त्यास ऑलिव्ह ऑईलमध्ये टाकून ते तेल वापरावे. आवळा व्हिटामिन्स सी असते त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतात.

 कापूर आणि एरंडेलचे तेल केसांना मजबूत करण्याचे काम करते. कापूर, एरंडेल आणि ऑलिव्ह ऑईल यांना एकत्र करुन हलके गरम करावे आणि केसांना लावावे.

 केसांच्या वाढीसाठी कांदा आणि नारळ तेलाचा वापर करावा. एका पॅनमध्ये नारळ तेल घ्यावे आणि त्यात कांदा घालून चांगले शिजवावे. थंड करुन हे तेल केसांना हलके लावावे.

नारळ तेलात २ थेंब टीट्री ऑईल टाकावे. यात काही वाळलेल्या कडीपत्त्याची पाने टाकावीत.या मिश्रणाला चांगले शिजवावे. गाळून बाटलीत भरावे. कोंडा जाईलच केसही सिल्की होतील.