व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास होणाऱ्या समस्या, जाणून घ्या लक्षणं
13 जून 2025
Created By: संजय पाटील
व्हिटॅमिन डी हे एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन डी मुळे हाडं, दात आणि स्नायू मजबूत होतात
व्हीटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशक्तपणा, डिप्रेशन, मूड स्विंग, थकवा या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
व्हीटॅमिन डी च्या कमरतेतमुळे शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं नक्की कोणती आहेत? जाणून घेऊयात.
डॉ सुभाष गिरी यांच्यानुसार, व्हीटॅमिन डी च्या कमरतेतमुळे कोणतेही जड काम न करताही शरीर थकल्यासारखे वाटते. त्यामुळे झोपल्यानंतरही ताजेतवाने वाटत नाही.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. तसेच हाडाना वेदना होऊ शकतात तसेच सूज येऊ शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर संसर्ग होण्याची शक्यता असते.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा