प्रोटीन पावडर घेण्याआधी जाणून घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी; अन्यथा वाढू शकते अडचण

31 July 2025

Created By: Swati Vemul

प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, ते अमिनो आम्लांपासून बनलेलं असतं

जेव्हा आपण प्रोटीन खातो, तेव्हा पचनसंस्था त्याचं अमिनो आम्लांमध्ये विघटन करतं

हे अमिनो आम्ल शरीरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी तयार करण्याचं काम करतात

परंतु अनेकांना हे माहीत नसतं की त्यांना दररोज किती प्रोटीन आवश्यक असतात

एखाद्याला आधीच किडनीचा आजार असेल तर त्यांनी जास्त प्रोटीन खाणं टाळावं

एका सामान्य प्रौढ व्यक्तीने प्रति किलो शरीराच्या वजनाच्या 0.8 ते 1 ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे

जर एखाद्याचं वजन 70 किलो असेल तर त्याला दररोज 56 ते 70 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात

तुम्ही जास्त शारीरिक हालचाल करत असाल तर तुमच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम सुमारे 1.6 ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजेत

तुम्ही आहारात डाळी, बिया, काजू, पनीर, सोया, टोफू, दूध-दही, चणे, शेंगदाणे, ब्रोकोली, बदाम, अंडी, चिकन, मासे इत्यादींचा समावेश करू शकता

तू चंचला, तू कामिनी..; मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!